हे पुस्तक वाचणं म्हणजेच ज्वलंत मानवी समस्या सोडवण्याची वाट शोधणं. ज्यांना ती शोधायची आहे, त्यांच्यासाठी हा संदर्भाचा एक दस्तऐवज आहे
कॉ. भीमराव बनसोड यांनी ३० महत्त्वाच्या पुस्तकांबाबत केलेलं हे लिखाण आहे. विविध विषयांवर काम करणाऱ्या किंवा अभ्यास-व्यासंग करणाऱ्या उत्तुंग व्यक्तींच्या वैचारिक-सैद्धान्तिक भूमिकांचा एक प्रकारे या लेखनात बनसोड यांनी ऊहापोह केला आहे. म्हणून दलित तसेच मार्क्सवादी विचारांचा आवाका समजून घ्यायलाही, हे लेखन मदत करेल. हे पुस्तक मूळ पुस्तकं वाचायला प्रेरित करते.......